STORYMIRROR

vaishali vartak

Romance Others

2  

vaishali vartak

Romance Others

रेशीम गाठी

रेशीम गाठी

1 min
122

आयुष्यात जुळतात

 रेशीम गाठी नशिबाने

पण स्वर्गात बांधल्या

असतात त्या देवाने


गाठीं रेशमी होतात

 करिता तडजोड

सहवासाने वाढे प्रेम

संसार होतो गोड


रेशीम गाठी सदा

 एकमेका देती जिव्हाळा

सुख दुःखात मिळूनी साथ

 भासे न कधी दुःखाचा उन्हाळा 


दोन जीव दोन कुळाचे

बांधले जातात रेशीम गाठींनी

सहजीवन आनंदी करीती 

साथ देत तडजोडींनी


 सहजीवन सुखी होण्या

 असे धागा विश्वासाचा 

 देण्या सुखाच्या घागरी

 रेशीम गाठीत महत्त्वाचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance