रातराणी कोमेजली
रातराणी कोमेजली
मने जुळूनी आपुली , वेडी मी कुठे फसली
माझे मलाच कळेना , प्रीत अशी का रुसली ।। धृवपद
दिली घेतली मिळूनी वचने ती उमजूनी
चंद्र असता नभात, चांदण्यात त्या रमूनी
रातराणी हळुवार लाजतच बहरली
माझे मलाच कळेना , प्रीत अशी का रुसली 1
लाट जशी सागराची,वाट पाही किना-याची
ओढ तुझ्या त्याभेटीची भासे सदा सहा-याची
तुझ्या येण्याची अजुनी ,आस सखया लागली
माझे मलाच कळेना प्रीत अशी का रुसली .... 2
किती दावलीस स्वप्ने सख्या भाबड्या मनाला
उगा दिधले बहाणे भेटण्यास न येण्याला
नको मज दावू आता रातराणी कोमेजली
माझे मलाच कळेना प्रीत आशी का रुसली... 3

