STORYMIRROR

Haresh zarkar

Inspirational

2.7  

Haresh zarkar

Inspirational

राष्ट्रीय एकात्मता- सैनिक हो..

राष्ट्रीय एकात्मता- सैनिक हो..

1 min
29.5K


राष्ट्रीय एकात्मता

धगधगता एकात्मते चा वारा वाहतो आहॆ.

या आपुल्या भारत भूमीच्या मातीवरती,

विविधतेने नटलेला ,हा भारतदेश असे आपुला.


हिंदू , शीख , बुद्ध, इसाई,

अन राहतात कोणी बेगडे,

भाषा असती अनेक बहुती,

असती अनेक त्यांची चाली- रीती.


कोणी लढती भारत भूच्या रक्षणासाठी

आणि कोणी पर भूमीच्या बुजऱ्या लोकांसाठी,

कुठे सांडते रक्त देश सेवेसाठी अन कोणी काढी

तो रक्त कोणी पर भूमीच्या स्वार्थी लोकांसाठी,

कुठे गुलाब, पुष्प बरसते अन कुठे दगडांचे घाव लागती,


कोणी ठोकिती गोळी कुणा देश रक्षणा साठी

अन् कोणी ठोकिती गोळी आपुल्याच लोकांवरती,

राष्ट्रासाठी कोणी झेलतो दगडांची हि मार,

अन स्वार्थासाठी कोणी घालतो पैशाची हि माळ,


हवा आता बदल असा , राष्ट्रीय एकात्मते मध्ये ,

आपुल्या पुन्हा सूर वाहवा आपुल्या राष्ट्रीय गीतेचा.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational