राजसा
राजसा
माझा म्हणून;
माझा होतो का कुणी.?
माझा होण्यासाठी;
माझेपण हवे असते कुणासाठी.!
माझे मन करण्यासाठी;
माझा म्हणून माझा हक्क द्यावा कुणी.!
माझा म्हणून;
माझेपण हरवून माझा करावा कुणी.!
माझा म्हणून नव्हे;
माझी राणी म्हणून राजपण ओतावा कुणी.?
माझा राजसा म्हणून;
भावनेला ही राणी पण यावा म्हणून...
स्वभावराज स्पंदन वा कुणी.!

