STORYMIRROR

Jyoti gosavi

Romance

3  

Jyoti gosavi

Romance

राधा बावरी

राधा बावरी

1 min
191

बहर आला चांदण्याला

 बहर आला यौवनाला

बावरी ती राधा हरीची

 वृंदावनी शोधी हरीला


त्रिभुवनी शोधता मिळेना

 कोठे गेला ग श्रीहरि

 का घेऊनी बैसला करी

 ती सवत माझी बासरी


शोधिता राधा बावरी

 सुर कानी बासरीचा

कोठून आला तो कळेना

 जीव वेडा झाला राधेचा


त्रिभुवन शोधून दमली राधा

 आळविते ये ना मुकुंदा

 येई कान्हा मनमोहना

तुझं विन मज काही गमे ना


थकून बसली कदंब तळा

 अश्रू वाहती राधेच्या डोळा

तोचि आला शब्द आत

 राधे मी तुझ्याच हृदयात


का शोधीशी वनी उपवनी

 का वाहते  निर नयनी

का येई शंका तव मनी

तू सखीच माझी जन्मोजन्मी


वेगवेगळे जना भासती

राधाकृष्ण एकच असती

 एकमेकांच्या हृदयी वसती

फक्त पाहिजे निखळ भक्ती 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance