Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mrs. Mangla Borkar

Abstract

3  

Mrs. Mangla Borkar

Abstract

पशु

पशु

1 min
4



माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे


कड्या-कपाऱ्यां मधुन घट फ़ुटती दुधाचे !!


माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या-फ़णसाची रास


फ़ुली फ़ळांचे पाझर फ़ळी फ़ुलांचे सुवास!!


माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी


पाना-फ़ुलांची कुसर पशु-पक्ष्यांच्या किनारी!!


माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा


पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा!!


माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा


ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा!!


माझ्या गोव्याच्या भूमीत चाफ़ा पानाविण फ़ुले


भोळा भाबडा शालिन भाव शब्दाविण बोले!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract