प्रत्येकाचा पाऊस
प्रत्येकाचा पाऊस


प्रत्येकाच्या पावसाची असे वेगळी कहाणी
कुठे ओठावरी हसू कुठे डोळ्यामध्ये पाणी
दाटलेल्या ढगांना कंठ फुटतो नभात
कुणा भासे सप्त सूर कुणा विरहाची गाणी
कोसळणाऱ्या धारासवे खवळतो सागर
काहींची हौस मौज काहींना आणीबाणी
जाता जाता मेघ तो ठेऊन जाई आपला रंग
इथे आनंद बहर तिथे वेदनेची निशाणी