परोपकारी सोयरे
परोपकारी सोयरे
वडाच्या पारंब्या भूईला टेकल्या |
रानातल्या मुलांनी खेळ तिथे मांडिला ॥
आंब्याच्या झाडांची किती गर्द सावली |
गाई - गुरं वाटसरू सावलीत विसावली ॥
चिंचेच्या झाडाला लहान थोरांचा गराडा ।
रानच्या या मेव्यासाठी पाणी सुटे तोंडाला ॥
उंबराच्या झाडाला म्हणतात ओंदुंबर ।
पक्ष्यांच्या न्याहरीसाठी पिकली गोड उंबर ॥
पिंपळाच्या झाडाभोवती बांधलेला पार ।
संध्याकाळी पारावर गप्पा - गोष्टी रंगणार ॥
तुळशीच्या झाडाला अंगणात मान ।
शुद्ध हवा पूर्वी तुळस औषधी छान ।
नारळाच्या झाडाला म्हणतात कल्पवृक्ष ॥
प्रत्येक भागाचा उपयोग अनुभव येतो प्रत्यक्ष ॥
लिंबाच्या झाडांची काय वर्णावी ख्याती ।
पूर्वीपासून ओळखती औषधाची वनस्पती ॥ ..
अशी ही झाडे परोपकारी सोयरे ।
त्यांच्या शिवाय जगणे व्यर्थ वाटते सारे ॥
म्हणूनच सर्वांनी ज्ञानी धरू गोष्ट ।
झाडे लावून जगू किती पडोत कष्ट ॥
