प्रिय आजोबा
प्रिय आजोबा
आठवणीतले भारी आमचे प्रिय आजोबा
पोरासंगे पोर होती माझे आजोबा
नातवडांना बोलावून घोगऱ्याशा आवाजानं,
ओठावर गाती गीता आमचे आजोबा .
आजोबा तुम्ही सकारात्मक सुविचाराचे महामेरू
हेवेदावे मोडूनी तुम्ही दिले मानवतेचे धडे बळी
न पडावे अज्ञानाला हे बोल तुमचे खडे धर्म देव आन्
समानतेचे तुम्हीच हो पुजारी रस्त्यावरच्या गरिबाचे
तुम्हीच हो कैवारी मानवतेचा संदेश तुम्ही बैठकीतून
दिधला आशीर्वाद सदा रहावा आण्णा तब आमच्यावरी.
