प्रीतीतही पडले तुझ्या..
प्रीतीतही पडले तुझ्या..
प्रीतीतही पडले तुझ्या
बावरीही झाले तुझी,
देऊनही बसले तुला
हृदयात मी स्थान रे
कारे असा फसवा खेळ
खेळला तू माझ्याशी,
थकले रे साहूनी मी
हरले आता सख्या रे
चांदण्यांत रोज शोधतो
तोच चंद्रमा आजही,
नको म्हणू फसवा मज
मी तोच राजहंस ग
सांगायचंय मला, तुला सारं
फक्त एकदा संधी दे,
पावसा सारखं थेंबा थेंबातलं
अंतर थेंबाने भरून काढायचंय
येतील जेव्हा सरी त्या
तूही ये सख्या त्यांच्यासह,
धुऊन टाक सारं जुनं
सुरुवात करुया एक नवी
नवखा नसला तरीही
मांडू सये डाव नवा,
उधळून देऊ विरह आता
साथ देऊ एकमेका

