STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

प्रीतिच्या बेटावर

प्रीतिच्या बेटावर

1 min
221

कुणीच नाही या वाटेवर

दोघे आपण या बेटावर


सागर पसरे दूर दूरवर

ढग नाचतात बघ तालावर


जरा विसावू या गवतावर

डोळ्यांत सलग बघत खोलवर


दिव्य भव्य बघ ही सुंदरता

मनात गुंजे ही मोहकता


निवळत गेली ही दाहकता

तोड मनाची तुझी शांतता


कवेत घे हे तारे सारे

वाहत आले प्रीतिचे वारे


चुंबून हळू घे दवबिंदू

ओठांवरील हे जलबिंदू


अवतरेल बघ इथेही स्वर्ग

आहे साक्षी सुंदर निसर्ग



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance