STORYMIRROR

Sumedha Adake

Romance

3  

Sumedha Adake

Romance

प्रेमकथा

प्रेमकथा

1 min
525



मनात माझ्या प्रश्न किती

उलघडू मी कोणापाशी?

उरात माझ्या रंग किती

उधळू मी कोणापाशी?


फुलांच्या संगतीत राहून

मन झाले फुलासारखे

सुकते अन कधी फुलते

कधी गुंडाळूनच बसते कळीसारखे


त्या कळीला एका

फुलपाखरांने खुलवले

आयुष्याचा आनंद

उघडया डोळ्यांनी अनुभवायला शिकवले


कळीला हे आजपर्यत

कोणी ना सांगितले

हे जाणून कळीचे

फुलपाखरावरती प्रेमच जडले


कोण जाणे यांचे नाते

का?कसे जुळले

मन कधी गुंतले

हे मात्र कोणास न कळले


रोज यांची भेट

होत असे

ते दृश्यही सर्वांना

मोहून टाकत असे


परंतु एक वेळ आली

अन फुलकलीचे आयुष्य संपले

ते त्या झाडाला सोडूनी

कायमचेच मातीत मिसळले


हे फुलपाखराला कळताच

त्यानेही प्राण त्यागले

देवाच्या उंबऱ्यात

दोघेही एकाच वेळेस पोचले


देवालाही पडला प्रश्न

त्यांना कोणत्या जन्मास घालावे

वेगवेगळे जन्म दिले तर

मग सांगा यांनी कसे जगावे?


निर्णय केला पक्का

त्या देवाने

सृष्टी सुंदर बनवली

त्या विश्वकत्याने


मग झाला त्यांचा जन्म

एकाच वेळीवरती

उमलुनी ती डोलू लागली

वाऱ्याच्या तालावरती


हसत- हसत

सुकुनी गेली

आणखी एकदा मातीत

मिसळूनी गेली


जन्म आला फुलपाखरांचा

फुलुनीच गेली त्यांची प्रिती

मनसोक्त आनंद लुटला जगाचा

"आयुष्य आहे सुंदर"

हेच ते सर्वास सांगती


आयुष्य जगत राहिली

क्षणा-क्षणापुरती

मात्र प्रेम गेले ठेवूनि

ते युगे-युगे ना सारती...!


।।अखंड प्रेम स्तूतेन भव:।।


Rate this content
Log in

More marathi poem from Sumedha Adake

Similar marathi poem from Romance