STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Romance

3  

Sanjay Raghunath Sonawane

Romance

प्रेमगीत-कवी-संजय रघुनाथ सोनवण

प्रेमगीत-कवी-संजय रघुनाथ सोनवण

1 min
514



प्रेम कुणावर ही का करावे

त्यास मन ,शरीर राजी असावे

जुलूम,अत्याचार कुणास का छेडावे

अधिकार जगण्याचे का हिसकावे

प्रेम कुणावर ही...........


जीवन धोक्यात का घालावे

सारासार विचार मनाला विचारावे

खरे प्रेम हे पारखून घ्यावे

उगाच घाईत का पडावे

प्रेम कुणावर ही..........


खोट्या प्रेमाचे दुःख ना मानावे

सुंदर आयुष्याचे ध्येय गाठावे

प्रेमळ मनावर प्रेम करावे

भूल थापाना थारा ना द्यावे

प्रेम कुणावर ही ...............


सुखाचे क्षण ना वाया घालावे

उगाच झुरत का बसावे

मृगजळ स्वप्नात का अडकून राहवे

मनसोक्त स्वातंत्र्य नित्य भोगावे

प्रेम कुणावर ही............


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance