STORYMIRROR

Vasudha Naik

Romance

3  

Vasudha Naik

Romance

प्रेमाचं गणित कळेना

प्रेमाचं गणित कळेना

1 min
21

सजणा विचारतोस मला

चल सजणी जाऊ फिरायला

ने तरी नाही कुठं धड बाहेर मला

नुसता म्हणतो जाऊ सिनेमाला....


फिरायला नेत नाही काही

सिनेमा दाखवत नाही मला

तुझ्या प्रेमाचं गणित कळेना 

अरे खरंच प्रेम आहे ना तुला.....


मी म्हणत नाही बाहेरच ने

कधीतरी काढ दिन माझ्यासाठी

मी पण लवकर आवरीन सारं काम

वेळ खास राखून ठेवीन तुझ्यासाठी....


मस्त दोघंच घरातच आराम करूया

दोघांनी एकमेकांना समजून घेवूया

यातही प्रेम आहेच की साजणा

प्रेमाच्या गप्पात रंगून जावूया.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance