प्रेमाची दुनिया
प्रेमाची दुनिया
डोळ्यातले भाव
शब्दात राहिले
मनातले ठाव
मुक्यात वसले
प्रेमाची दुनिया
अशीच असती
नशीबाची किमया
आडवी येती
घाव असतात
मनावर झालेले
तरीपण हसतात
प्रेमात फसलेले
भेटल्यावर सांगायचं
ठरलं होतं
समोर दिसताच
काळीज धडधडतं
हसून समोर
आली पट्कन
मिटलेली नजर
वळते चटकन्
सांगायची वेळ
जवळ आली
मिटवून ताळमेळ
लांब गेली
चेष्टा केली
दोघांच्या नशिबानं
वाट चुकली
बरोबर चालतानं

