STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

प्रेमाचा पाऊस

प्रेमाचा पाऊस

1 min
225

प्रेमाच्या पावसात

मी प्रेमाचे गीत गात असताना

तू माझ्याकडे बघून हसतं होती

पावसात येण्याच खुणवत होती

तेव्हा माझ्या गाण्यातले ढग

जरा जास्त गरजायला लगले


मी पहात होतो तुला

सरींना कवेत घेताना 

तू सडा फुलांचा वेचतं होती

तेव्हा तुला नसेल वाटतं पण मला वाटायचं

फुले वेचायला तुला

मदत करावी

पण फुले तुझ्या कवेत

जास्तच लाडावलीत


चिंबचिंब भिजतानाही

तू तुझ्या वेणीसाठी गजरा केला

वाटल मला बोलवशील

वेणीला गजरा लावायला

पण तेव्हाच माझ्या गाण्यात

पाऊस खवळला आणि

तुझ्यावरच जास्त मेहरबान झाला


तेव्हा मी पहात होतो

तुझ भिजलेल रूपं

खरच तू खुप सुंदर दिसत होती

आणि तुला पाहून माझ्या

भावनांची बागही फुलत होते


काय माझ्या गाण्याचा शेवट असेल मला माहीत नाही

पण माझ्या हृदयातल्या परडीतील फुलांना

तू वेचलेल्या फुलांची 

सोबत हवी आहे

देशील की नाही मला माहित नाही

पण ....हो....

माझं पावसाचं गाणं संपल्यावर

मी तुला शोधणार आहे

भेटण्यासाठी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance