प्रेमा तुझा रंग कसा
प्रेमा तुझा रंग कसा
दिसतो का रे सर्वांना
प्रेमा तुझा रंग कसा
सांगता येत नाही कोणा
ज्यात मिळविला तसा.......!!
कष्टकऱ्यां बळीचा रंग
मातीच्या ढेकळावानी
गरीबीचे चटके सोसत
करी पावसासाठी विनवणी.....!!
एक रंग आयुष्याचा
लालबुंद कुंकवावानी
ज्याचं सौभाग्य हरवले
नको ती आर्त विराणी.....!!
प्रेमा तुझा एक रंग
एक मधूचंद्रावानी
तुझ्या सहवासाची
किती मी रे दिवाणी.....!!
प्रेमाला ना रंग असतो
ना असती कसली जात
प्रेमासाठी वाट्टेल ते
जगुया आनंदाने गाणे गात.....!!
प्रेमाला ना भाषा असते
मुक्या त्या संवेदना
काळजाच्या कुपीत ठेवल्या
साऱ्या त्या वेदना.....!!

