STORYMIRROR

Bharati Sawant

Romance

3  

Bharati Sawant

Romance

प्रेम

प्रेम

1 min
276

कथा आपल्या प्रेमाची

होईल का सुखी संपन्न

नको समाजाची पर्वा

करतील प्रेमाला विपन्न


इतिहासाच्या पानावर

लिहू आपली प्रेमकथा

तू रांझा मी तुझीच हीर

नाही प्रेमात काही व्यथा


स्नेहार्द्र गोडवा मनातला

नात्यागोत्यांत तो दिसावा

ऋणानुबंध जोडू सर्वांशी

प्रेमाचा स्नेहबंध असावा


पूर्वपुण्याईचे फळ मला

मिळालेय तुझ्या प्रेमाने

दिन-रात करीन मी कष्ट

भिजूनच जाईन घामाने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance