STORYMIRROR

Shobha Wagle

Romance

3  

Shobha Wagle

Romance

प्रेम संसार

प्रेम संसार

1 min
242

काय जादू अशी केली

तुझ्या प्रेमात पडले

माझे मला न कळले

तुज स्वप्नात रंगले.


नजरेच्या इशाऱ्याने

मन भाव ओळखले

सखा होशील म्हणून

तुज स्वप्नात रंगले.


हात हाती माझा घेता

अंग माझे शहारले

तुझ्या संगे चालताना

मन माझे मोहरले.


प्रीत अशी ही जुळली

मला नाहीच कळले

लग्न गाठ ही बांधुनी

स्वर्ग मजला लाभले.


पौर्णिमेचा तो चंद्रमा

तारकांच्या रिंगणात

रास क्रिडा नभांगणी

मम सखा हृदयात.


संसारात मी दंगले.

साजणाच्या संगतीने

स्वप्न माझे साकारले

माझ्या प्रियाच्या जोडीने.


एक मागणे मागते

साथ साजणाची सदा

लाभो जीवनात मला

नको दुरावा हा कदा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance