प्रेम बहर
प्रेम बहर
भावनांच्या झोक्या सरशी मन बीज हे उडते
अलगदसे उतरूनी कुण्या ह्र्दयी रूजते
हळुवार तयाशी नाते सॊख्याचे जडते
नकळ्त तयातुनी प्रेम फ़ुल मोहरते
मनोमनी कुणीतरी जपत असते
एकटीच मोहरते कधी कोमेजते
चोरटे न्याहाळता नजर गवसते
आणी उमजते ती जीव लावते.
गुलाबी गुलाबी हुरहूर दाटते
मधुर मुरली सुर उमटले
आनंदी आनंदी रोमांच नटले
मोहक सुगंधी दरवळ पसरे
हवी हवीशी जवळीक
रसरसुनी फुलले गुलाब
मोहक प्रेमभरी नजर
फुलन आला प्रेम बहर

