STORYMIRROR

Rahul Shedge

Romance

3  

Rahul Shedge

Romance

प्रेम आंधळं असतं

प्रेम आंधळं असतं

1 min
12.1K

प्रेम हे कधी आंधळं असतं  

प्रेमाला समजुन घ्यावं लागतं ॥धृ॥


प्रेम हे कधी नजरेनं दिसत नसतं 

प्रेमाच्या नात्याला समजावे लागतं

प्रेम हे हृदयाला फुलवतं असतं   

भाव-भावनांनी मन हे दाटतं ॥१॥  


प्रेमाला सारे जग वेगळं वाटतं

रंगीबेरंगी दुनियेत ते वावरतं

मधुर सुगंध चोहीकडे पसरवतं 

मनाला बेधुंद ते करत असतं ॥२॥


प्रेमाला जिव्हाळ्याने संभाळावं लागतं 

मनापासून प्रेम करावं लागतं

अव्यक्तपणे ते व्यक्त व्हावं लागतं

मनाला-मन हे कळावं लागतं ॥३॥ 


हृदय कल्लोळाने मन भरून जातं  

आतुरता मनाला लावून जातं 

प्रेमात भान हरपून जातं

अथांग वाहणारे प्रेम करावं लागतं ॥४॥   


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance