पोरगी मनात बसली...
पोरगी मनात बसली...
शाळेत जातानी एक पोरगी
माह्या गल्लीतून दिसली ।
पाह्यलं ब्वा तिले तं
ती पोरगी मनात बसली ।।
कवाइच दिसली नव्हती मले ती
व्हती आमची ती पयलीच भेट ।
तवापासून राजे हो ती
कायजात शिरली माह्या थेट ।।
बोलासाठी तिच्यासंग मी
चानस पाहू लागलो ।
प्रेमापायी तिच्या तं मी
रात रातभर जागलो ।।
काय मालूम कसं काजून तं
माह्या सोपत्याइले हे कयलं ।
लिवून माह्या नावानं एक चिट्ठी
त्याईनं तिच्याकळे पाठीवलं ।।
वाचली जवा तिनं चिट्ठी
माह्यापाशी आली हासत हासत ।
लईच खुश ती तं तवा
मले व्हती दिसत ।।
पाह्यलं माह्याकळे तिनं अन् ईचारलं
हाऊ मच डु यु लव मी?
कयलं नाई मले म्हणून म्हटलं तिले
इकत असतो वडापाव मी ।।
गोट काळली वडापावाची तं
ती थोडीशी लाजली ।
अळाणी माह्या लवर तू
आपली जोडी साजली ।।
मंग हिम्मत करून म्या म्हटलं तिले
आय ला ब्यु ।
तिनंई म्हटलं नं मले
सेम टू यु ।।
अशी आमची प्रेमकहाणी
लई हाय मजेशीर ।
अळाणी माह्या मनाले
तिनं केलं अधीर ।।

