STORYMIRROR

Arun Gode

Romance

3  

Arun Gode

Romance

पंख फुटले स्वप्नांना

पंख फुटले स्वप्नांना

1 min
360

पंख फुटले स्वप्नांना

स्वछंद पक्षी आकाशी झेप घेते,

हे नेहमी मी डोळ्याने बघते.

उडता येत नाहीची खंत असते,

किती छान जर मला पंख असते.


आकाशात उडन्याचे स्वन्प मी बघते,

पंख बिना कां हे शक्य असते ?.

तरुन पणात मी पाय ठेवते, 

कोणाची चाहुल माझे लक्ष वेधते.


हळू-हळू प्रेमाची चाहूल गती घेते,

मनाला पंख लागल्याचा भास होते.

तरूण पणाचे लक्षण भासते,

मन कितीही आवरावे तरी भटकते.


प्रेमाच्या स्वप्नात मी हरवते,

मी नेमकी कोणाची वाट कां बघते?. 

स्वप्नांना माझ्या पंख फुटले असते,

असा मला विलक्षण भास का होते?.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance