STORYMIRROR

Prashant Sahane

Classics Inspirational Others

3  

Prashant Sahane

Classics Inspirational Others

पित्राचे पुण्य

पित्राचे पुण्य

1 min
200

तु फोडलास टाहो आणि जगी ह्या आला,

नवजात तुच नाही  बापाचाही जन्म झाला


डोळे भरुनी बघता दाटुनी कंठ आला

मी आज बाप झालो सांगु कुणा कुणाला


दमडा खिशात नाही पेढे वाटतो खव्याचे

रडणे ही भासु लागे आलाप संगीताचे


पेड्यांचा गोडवा तो शब्दांमधे जपा रे,

पित्राचे पुण्य माझ्या पदरी खुशाल घ्या रे..


त्या धाकल्या मुळे तु आता वडील झाला

दे श्रेय तु जरासे त्याच्या धाकल्या पणाला


झाले अनेकवेळा, केले माफ तु चुकीला,

आहे तुझाच भाऊ, हिणवु नकोस त्याला 


स्पर्धा ही ज्या ठिकाणी प्रगती तीथेच होई

पण  राग, द्वेश तुमचा पाहुणा बनुन येई


तो राग, द्वेश तुम्ही मनी साठवु नका रे

पित्राचे पुण्य माझ्या पदरी खुशाल घ्या रे


का पाप-पुण्य दोन्ही, भासे तुला समान?

तु चुक मी बरोबर, ह्याचे मिळेना प्रमाण..


करशील घाव गहीरे, शब्दांच्या कोयत्याने

उगवेल भोवताली, जे तु पेरले हाताने…


आहे भरेल झोळी, अंगी बाण सद्विचार,

करशील काय जेव्हा दाटेल अंधकार?


सद्सदविवेकबुद्धी ची हाती मशाल घ्या रे

पित्राचे पुण्य माझ्या पदरी खुशाल घ्या रे


मी खातेफोड केली, दिली संपत्ती एकराची,

न मागताच केली, ईच्छा पुर्ण लेकराची


धृतराष्ट्र मीच झालो, सोपवून कारभार

खंजीर काळजाच्या शकुनी करील आरपार


मज अग्निडाग देण्या येऊ नको खरेतर

इच्छा अखेरची ठेव लक्षात जिंदगी भर


मज कावळ्यात नाही माणसातही बघा रे

पित्राचे पुण्य माझ्या पदरी खुशाल घ्या रे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics