धुंद मी झालो
धुंद मी झालो
धुंद मी झालो बघता लोचने,
मोहरून आले माझे जग सुने
गंधाळल्या अवघ्या दाही दिशा,
सांगु कसे हे तुला रे पावसा ऽऽऽ…
श्वासात घे सामावुनी,
बेधुंद तु, बेधुंद मी….
विसरुनी हे जग बावरे
असते सदा ध्यानी मनी…
वाढवुन गेली ह्रिदयी स्पंदने,
धुंद मी झालो बघता लोचने॥
तेज वदनाचे झळके सोन्यापरी,
गंधीत झाली तुला स्पर्शून कस्तुरी,
चंद्र-सुर्याला ना उरले भान ही
पाहुनी उसळे सागर लाटांवरी,
कांती तुझी ही भरजरी,
मृगजळ तु वाटे मज खरी,
आभास हा होई सदा,
प्रतीमा तुझी क्षितीजावरी
आभाळ झाले मजला ठेंगणे,
धुंद मी झालो बघता लोचने॥
कुंतले ओली झुलती पाठीवरी,
पापण्या लुक लुक खेळे अंताक्षरी,
गालीच्या ओठी कोमल पुष्पांजली,
लावण्य भासे हे मजला मखमली,
वर्णु किती ए सुंदरी
धर्तीवरी आली परी
उजळुनी गेल्या साऊल्या
तेजोवलय ह्या अंबरी…
निस्तेज भासे मजला चांदणे,
धुंद मी झालो बघता लोचने॥

