पावसाचे गाणे
पावसाचे गाणे


तुला पाहिले मी लिहले पावसाचे गाणे
थेंब झेलले शब्द वदले पावसाचे गाणे ।।धृ।।
धो धो पाऊस होता कोसळत
पानाफुलांना होता भिजवत
गाली पडले थेंब टपोरे पावसाचे गाणे ।।१।।
ऋतु निराळा जगावेगळा
आठवणींंतील हा पावसाळा
ong>वेड लावी माझ्या मनाला पावसाचे गाणे ।।२।। खट्याळ वारा उडवी पदरा सौंदर्यावर खिळती नजरा चिंब अंग असे न्याहळण पावसाचे गाणे ।।३।। मेघ बरसले नभात दिसले इंद्रधनुनेही रंग उधळले तृप्त धरणी तुझ्या आठवणी पावसाचे गाणे।।४।।