इतिहासाच्या व्यासपीठावर
इतिहासाच्या व्यासपीठावर
1 min
27.1K
इतिहासाच्या व्यासपीठावर
पराक्रमाची शान लोकोत्तर
पुन्हा एकदा दाखविन म्हणतो ॥धृ॥
राम होऊनी रामायणी
रावण राक्षसांस मारूनी
अहिल्या कुब्जास उध्दारूनी
सज्जनास तारिन म्हणतो ॥१॥
कृष्ण होऊनी महाभारती
धनुर्धराचा रथसारथी
विषण्णतेच्या जीवनमार्गी
भगवतगीता बोधिन म्हणतो ॥२॥
साहसी राजा शिवछत्रपती
परस्त्री माता न्यायाची नीति
राज्य राबवी रयतेसाठी
आदर्श तयांचा जपेन म्हणतो ॥३॥
नेताजी सुभाष राणा प्रताप
भगतसिंह बाबू गेणूसम
स्वातंत्र्यास्तव लढले अमाप
त्याग तयांचा स्मरेन म्हणतो ॥४॥
