वारी वारकऱ्याची
वारी वारकऱ्याची

1 min

198
पाऊले चालती थकते ही वाट
वर्षानुवर्षांची अशी वहिवाट
दिंड्या-पताका हाती घेऊन
ऊन-पावसाचा त्याला ना शीण
अबाल-वृद्ध जन हे चालले
ग्यानबा-तुका मुखी गरजले
टाळ-मृदंगही बोलू लागले
चल रे भक्ता उचल पाऊले
मुक्कामी गावी पालखी विसावे
हरिपाठ आणि कीर्तनी रंगावे
मुखी अभंग साधुसंतांचे
हातामध्ये टाळ वैराग्याचे
भजनी-कीर्तनी मृदंग हा बोले
विठ्ठल नामाचा गजर हा चाले
वीणा-चिपळ्यांचा मधुर नाद
पांडुरंगाशी साधतो संवाद
मुखी विठ्ठलाचे घेता हो नाम
वारकरी पावे सदा अंतर्धाम