STORYMIRROR

Balasaheb Hire

Tragedy

4  

Balasaheb Hire

Tragedy

पावसाचा दंश

पावसाचा दंश

2 mins
283

आता रोज बघतो मी पाऊस 

फ्लॅटच्या मोकळ्या गॅलरीतून

तेव्हा आठवणींचे मोहळ

मनाला करतात नव्याने दंश 

असाच धुवांधार पाऊस लहानपणी सुद्धा पडायचा

दारातून हात बाहेर काढून आम्ही भावंडे

झेलायचो त्याला हातावर नंबरशीर

त्याच्या उडालेल्या कारंजाने

आमचा कळकट चेहरा साबण

लावल्या सारखा स्वच्छ निघायचा 

अशी लुटायचो आम्ही पावसाची मजा

चार भिंतींच्या कोनाड्यातून

जेव्हा व्हायचा पाऊस तरूण

तेव्हा त्यांच्या राक्षसी ताकदीपुढे

धाब्याची घर जायची त्याला शरण

तेव्हा पाऊस घरभर लंगडी खेळायचा

घरातील सगळी लहान मोठी पितळी भाडे

त्याच्या प्रत्येक धारेखाली आम्ही ठेवायचो

आपल्या गर्भात घ्यायची सामावून ती

पावसाला कडेलोट होई पर्यंत

आणि शेवटी घरात व्हायचं चिखलाच खळ 

गरीबी मळण्यासाठी

एक कोपरा कोरडा राहून द्यायचा आम्हाला

रात्रभर आसरा दयावान होऊन

आईच्या मांडीवर डोकं टेकवून झोपून जायचो आम्ही 

आई भिंतीला टेकवून काढायची रात्र तसा 

बाप बिडी पिण्यासाठी उगाळायचा काडी

व त्याच उजेडात आढ्याकडे बघत ठेवायचा जागता पहारा 

घरावरच्या पटाईवर आणि धाब्यावरील पेंढावर

कदाचित होऊ नये त्यांनीही पावसाचं गुलाम किंवा

नाईलाजाने शस्त्र टाकून मिळून जाऊ नये

शत्रूच्या गोटात माणसाचा चिखल करण्यासाठी

रात्रभर लावायचा समाधी पाऊस

तेव्हा भूकेच्या डोहाळ्याने आवडणारा पाऊस

नावडता व्हायचा कधी कधी पावसाचा हातावर

पडलेला थेंब गोल गरगरीत भाकरी सारखा दिसायचा

सकाळी आई चिखलाला तुडवत घ्यायची शपथ

पुढच्या वर्षी घरावर नवा पेंढ टाकायची नाहीतर पत्रे टाकायची

पण दिवसपाळी रात्रपाळी करूनही

गरीबीच्या धुरात तिचं स्वप्न जायचं कायमच हरवून

कधी डोळ्याला लागायचं कडू आणि आसवांचा

अडवलेला फुटायचा बांध पदराला ओले ठेवणारा

काल बायकोने घरातील जुनी पितळेची मोड

विकतांना आईने काढून ठेवली

जुनी पितळाची भांडी बायकोने तणतण करतांना सुद्धा

कारण तिच्या संसारावरचा पाऊस तिच्यासारखीच

शेवट पर्यंत झेलणारी जुनी जाणती पितळेची खोड आठवणीने जपण्यासाठी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy