STORYMIRROR

Balasaheb Hire

Tragedy

2  

Balasaheb Hire

Tragedy

पाण्याची लंका

पाण्याची लंका

1 min
79

उन्हाळ्यात आग ओकणाऱ्या

सूर्याकडे पाहून तो बायकोला

लाडाने म्हणाला 

चल आता सुट्टी मध्ये लांब

येऊ फिरून 

पोरांना पाठवू मामाकडे दोघे देवदर्शन 

येऊ करून 

आज पर्यंत तुझ्या आवडी निवडी

वर चिटकलेला 

मी काढून घेतो टेप 

झाकोळलेल्या तुझ्या सौंदर्यावर

मार सुगंधी स्प्रे 

आणि पावडरचा लेप 

स्त्री स्वातंत्र व स्त्री सन्मानाची

आपल्या घरातूनच करु सुरुवात

स्त्रीमुक्तीची समाजा समोर उंच

मारू आता झेप

तेव्हा 

चेहऱ्यावर पडलेल्या सुरकत्या

पेक्षा तहानेने कोरड्या पडलेल्या

सासू सासऱ्याच्या ओठांकडे

पाहतांना डोळ्यांच्या कपारीत

आसवे लपवून बायको म्हणाली

त्यापेक्षा 

विहिरीच्या गर्भात उतरून 

हंडाभर पाण्याची दोघे एखादी मारू

आता खेप

जेव्हा

बाईच्या डोक्यावरील उतरेल हंडा

घरादारात येईल पाण्याची लंका

तेव्हाच

स्त्री मुक्तीचा मारता येईल डंका


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy