STORYMIRROR

Shravani Barge

Romance

3  

Shravani Barge

Romance

पाऊस-विविध रुपातला

पाऊस-विविध रुपातला

1 min
33


पाऊस... असाच अवचित येणारा,

कधी रिमझिम तर कधी धो धो बरसणारा


पाऊस... आगमनाने बळीराजाला सुखावणारा,

तर कधी त्याच्याच डोळ्यांतून कोसळणारा


पाऊस... प्रेमी युगुलांना हवासा वाटणारा,

भावनांचे मोहोळ नकळत चेतवणारा


पाऊस... विरहाच्या दुःखात जाळणारा,

आठवणींच्या सरींनी चिंब करणारा


पाऊस... अविरत कोसळून नकोसा वाटणारा,

कधी उगीचच दडी मारून छळणारा


पाऊस... श्रावणात रविकिरणांशी लपंडाव खेळणारा

अन् नभी इंद्रधनूची नक्षी रेखाटणारा


पाऊस... नवोदित कविमनाला प्रेरित करणारा,

आकाशातून थेट कागदावर उमटणारा


Rate this content
Log in