नजर...
नजर...


आठवते का गं तुला?
अचानक झालेली आपली नजरानजर
अन् मनाची घालमेल
मग नेहमीचेच झाले पाहणे
जादूच होती ना ती ?
माझी तर वर्गातील जागा
फिक्स असायची
अर्थात तुझ्या बसण्यावरून
कधी कधी कोपरा गाठायचीस
असेच... मला छळायला
रोजचा होता ना हा खेळ !
कधी तू जिंकलीस
तर कधी मी !
पण मजा होती हरण्यात...
तुझ्या चेहऱ्यावरील भाव टिपण्यात.
काय खुलायची लाजून तुझी कळी !
जणू कट्यारच काळजात घुसायची
कित्येक महिने असेच सरले
पण शेवटचा डाव झालाच नाही आपला
तू अर्ध्यावर सोडून गेलीस
अजून जातो तिथे
अन् घुटमळत राहते नजर
तो चेहरा,
ते लाजणे,
हरवले ते कायमचेच...
हरवले ते कायमचेच...