STORYMIRROR

Shravani Barge

Tragedy

3  

Shravani Barge

Tragedy

अभंग - कोरोना महामारी

अभंग - कोरोना महामारी

1 min
295

नको रे कोरोना l आता पाहू अंत l

ही मानवजात l दीन भासे ll १ ll

उद्योग बुडाले l घटली निर्यात l

नुरली किंमत l रुपयासी ll २ ll

गेला रोजगार l भाकरीची भ्रांत l

वेदनेला अंत l नसे काही ll ३ ll

दीनदुबळ्यांनी l जगायचे कसे l

आधारच नसे l कोणाचा रे ll ४ ll

झाल्या बंद शाळा l व्यथा शिक्षणाची l 

चिंता भविष्याची l ग्रासे आम्हा ll ५ ll

सण,समारंभ l सुनेसुने गेले l

भक्तही मुकले l वारीस हो ll ६ ll

लागण होता रे l एकटे जगणे l

नसे येणे-जाणे l स्वकियांचे ll ७ ll

किती आप्तजन l सोडूनिया गेले l

दर्शन ना झाले l शेवटीही ll ८ ll

वास्तव कळाले l आलो भानावर l

निसर्गासमोर l क्षुद्र आम्ही ll ९ ll

कष्टप्रद भोग l सोसवत नाही l 

कशी संपावी ही l महामारी ll १० ll

वारी देवराया l मुक्त आम्हा करी l 

प्राणिजात तारी l मागणे हे ll ११ ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy