पाऊस :तुझी आठवण
पाऊस :तुझी आठवण
रिमझिम पाऊस येतो
घन काळे अन् सोबत तुझी
आठवण घेअुन येतो …
रिमझिम पाऊस अन्
भिजऱ्या मातीचा गंध
माझ्या आठवणींत मात्र
तुझाच तो अनामिक सुगंध
रिमझिम पाऊस ..
श्रावणात पाठशिवणीचा
ऊन-पावसाचा खेळ रंगतो
मी मात्र रिमझिम पावसात
तुझ्याच स्वप्नांत रमतो
रिमझिम पाऊस ..
तू आणि तुझी आठवण
याशिवाय सोबत कुणीच नसतं ..
रिमझिम पाऊस येतो
घन काळे अन् सोबत तुझी
आठवण घेऊन येतो …

