गंध तुझा
गंध तुझा
गंध तुझा मोगरी
गात्र गात्र मोहरी
पैलूविन चमकते
कोण तुझा जोहरी?
तू दुर्मिळ कस्तुरी
परिमळ दिगंतरी
भासांच्याच फैरी
हाय छळे मस्करी.
स्मित शोभे अधरी
दुग्ध जसे शर्करी
बोल हाय ऐकले
सावळ्याची बासरी.
रत्न तू अलभ्य जरी
भास पुरे आता तरी
दौलत समजून कुबेरी
गंध तुझाच अंतरी...