रम्य आठवणी
रम्य आठवणी


सायंकाळी कातरवेळी, हृदय गोठून जाते
गर्दी आपल्या रम्य क्षणांची, मनात दाटून येते
दिवसा असतो स्वप्नांत तुझ्या, सीमेवरल्या तरूतळी
एकटाच तिथे मांडतो तुझ्याशी, आपल्या संसाराची भातुकली
दुःखही तिथे विरून सुखाचा, आकार निराळा घेते
अन गर्दी आपल्या रम्य क्षणांची, मनात दाटून येते
रेखाटतो मग तुझीच शिल्पे,उरल्या सुरल्या दुपारी
वेडावतो बघ तुझ्याचसाठी,फक्त तुझ्याच विचारी
हळूच कोवळी रंगछटा तुझा,आभास विहंगम देते
अन गर्दी आपल्या रम्य क्षणांची, मनात दाटून येते
रात्र साजिरी तुझ्या रूपाने, मला अशी ग खुणावते
स्वार होऊनी नभावरती जणू, तूच मजला बोलावते
निद्रा माझी स्वप्नातूनही, गीत तुझे गुणगुणते
अन गर्दी आपल्या रम्य क्षणांची, मनात दाटून येते