लपंडाव
लपंडाव


किती दिवसांनी आज तू मला दिसली होतीस
नजरेला नजर देऊन तू एकटक बघत होतीस
काही न बोलता खुप काही सांगत होतीस
माझ्या मनाला तू हेलकाऊन सोडत होतीस
जवळ आलो मी तुझ्या तुझे हृदय धडधडत होते
तेच तर माझ्या प्रेमाचे दिसणारे पहिले प्रतिक होते
मला जवळ पाहून तू काहिसी घाबरली होतीस
आजुबाजुच्या लोकांना पाहून तू मनाला धीर देत होतीस
तुझ्या मनाची तार तू माझ्या मनाशी जोडत होतीस
खरचं प्रिये आज तू मला आपल्या प्रेमात ओढत होतीस
समोर असता माझ्या तू थोडी फार लाजत होतीस
नजर कधी खाली वर होऊन मनातून तू बावरी होतीस
तुझ्या हृदयात ही प्रेमाचा बहर येत असावा
पण भितीमुळे तुला तो व्यक्त करता येत नसावा
तो तर दुनियेला दाखवायचा एक भाग होता
तुझ्या आणि माझ्या मनाचा तो एक लपंडाव होता