STORYMIRROR

Ajit Patankar

Abstract

4  

Ajit Patankar

Abstract

पाऊस अवेळी पडतो

पाऊस अवेळी पडतो

1 min
343

पाऊस अवेळी पडतो

तिमिराच्या झोताखाली

काजळी गर्द डोळ्यात

बुबुळेही विस्तव झाली 


कोंडून सांडली गर्दी

रस्त्याच्या बाजूस जेव्हा

गावठाण कधीचे सरले

वेशीवर हुल्लड आली 


दिसताच पुन्हा दु:स्वप्ने 

मी गपकन डोळे मिटतो

गात्रांच्या अंतर्यामी

अंधार पुन्हा पांघरतो 


चंद्राशी जुनेच नाते

अताशा राहिले नाही

मी तरीही प्रयत्न करतो

कवितेचा काहीबाही 


देहास शिथिलता येता

हा थरथर करतो हात

विझताना मंदच होते

समईची वात न वात 


वाळूला नसते भान

वळलेली कुठली मूठ

पाऊस अवेळी पडतो

वाळूची घेण्या भेट


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract