STORYMIRROR

Ajit Patankar

Children

3  

Ajit Patankar

Children

बालपण

बालपण

1 min
148

आठवतात का तुला

आपले लहानपणचे खेळ 

दुपारनंतर संध्याकाळची

बावरलेली सांजवेळ


शाळेच्या शेवटच्या तासाला

मनात असायची घरची ओढ

बापडं घरच्या अंगणात आणि

त्याला सवंगड्यांची जोड


शाळेतून घरी पोचायचो

कसेबसे धावतपळत

आजच्यासारख्या तेव्हा

रिक्षा कुठे होत्या मिळत ?


मधल्या सुट्टीतली उरलेली

खिशात दोनचार चणे बोरं

खेळताना नेमकी टपलेली

त्याच्यावर आजूबाजूची पोरं


पडलो लागलं म्हंटल्यावर

त्यावर लावायची माती

डेटॉल, सॅव्हेलॉन वापरायची

कुणाचीच नव्हती छाती


खेळून घरी आल्यावर

संध्याकाळचा परवचा

म्हंटल्याशिवाय सुटका नव्हती

भरवसा नव्हता जेवणाचा


रात्री मात्र बिछान्यावर

आजीच्या मऊमऊ गोष्टी

मग हळूच जायचं झोपी

होती दृष्टीआड सृष्टी


सगळं विरून गेलं आता

खिशात पैसे पुष्कळ आहेत

वाहवाह होते तोंडदेखल्या

संबंध मात्र फुटकळ आहेत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children