पाऊस अन् भेट...
पाऊस अन् भेट...
भेटायचे आपले जेव्हा ठरते
पावसालाही नेमके तेव्हाच यायचे असते..
पाऊस आणि आपले भेटणे
नुसत्या कल्पनेनेही अंगावर आणतात काटा,
हा बेफाम बरसणारा पाऊस
अडवणार तर नाही ना तुझ्या वाटा ?
सोसाट्याचा वाहतोय वारा
भेटीसाठी असेल कुठे निवारा?
पण ओढ मनाला पावसातच तुला भेटण्याची,
तुझे चिंब भिजलेले रुप न्याहाळण्याची...
मग हवा कशाला निवारा ?
हातात घेऊन हात ,
पसरुन दोन्ही बाहू
धो धो बरसणारा पाऊस मिठीत
घेऊन पाहू...।
ह्या पावसाळ्यात पुन्हा भेटायचे ठरवून पाहू...।