तू येशील..?
तू येशील..?
तुझ्या येण्याचा मनाला जडलाय ध्यास,
तुजवीन सखे आता घेता येईना श्वास ...
पुन्हा तुला घेऊन मांडायचाय डाव नवा,
अन् त्यासाठी तुझा हात माझ्या हाती हवा...
तुझ्या येण्याने मन होईल धुंद,
जसा पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा गंध...
भेटीला आपल्या साक्षी राहतील चंद्र - सुर्य -तारे,
त्यांच्या प्रकाशात आयुष्य आपले होईल तेजोमय सारे....
तुझ्या येण्याने मनी जागेल नवी आस,
तुझ्या येण्याचा आता मलाही वाटतोय विश्वास .!

