तिची नजर...
तिची नजर...
1 min
227
आज खूप दिवसांनी ती दिसली ,
पाहून मला हलकेेेच लाजली ...
पाहताच तिला भागली मनाची तृष्णा
जणू ती माझी राधा अन् मी तिचा कृष्णा...!
मनं दोन्ही सुखावली ,
आज खूप दिवसांनी ती दिसली...
चेहऱ्यावरील आनंद तिच्या लपत नव्हता,
पण, गप्प राहण्या वाचून पर्याय नव्हता...
मग नजरेस तिच्या मी नजर दिली,
'कशी आहेस?'.. हळूच खुुुण केेली...
डोळ्यांंची पापणी तिची नकळत ओलावली ,
'तुुझीच आहे मी..'. तिची नजर सांगून गेेली...!
आज खूप दिवसांनी ती दिसली...