पाठीराखा भाऊ माझा
पाठीराखा भाऊ माझा
पितृतुल्य माझा दादा
करी ममतेची उधळण
लाभावे उदंड आयुष्य
गेले आनंदी बालपण...१!
खूप करीता लाड माझे
प्रत्येक गोष्टीची हौस पूर्ण
आधारस्तंभ हा जीवनाचा
त्याच्याविना आयुष्य अपूर्ण...२!
पाठीराखा दादा माझा
सदा रहावा आनंदात
यशाची घेऊन उंच भरारी
कीर्ती पसरावी गगणात..३!
जसे जगी रामराजा झाले
तसे दादांचे प्रेम निर्मळ
सदा रहावे शिरी कृपाछत्र
जगात पसरावा परिमळ...४!
दीर्घायुषी व्हावे ही आशा
पूर्ण होवो सकल कामना
मन:पूर्वक देतो रे शुभेच्छा
कळाव्या माझ्या प्रेम भावना...५!