STORYMIRROR

Rohini Gaikwad

Tragedy

4  

Rohini Gaikwad

Tragedy

पाणीटंचाई

पाणीटंचाई

1 min
619

पाणी पाणी पाणी गाऊ किती गाणी

तुजविण सृष्टी दिसे सुनी सुनी


प्रातःकाळी कामे तुज साथी होती

झोप येईना माठ रिते असती


सानथोर वणवण भटकती

जेथे दिसे तेथे तुटून पडती


पशुपक्षी व्याकुळ किती रे झाली

रान सोडूनी शहरात घुसली


पाण्याविना शेत रान करपली

बळी दुभंगला कर्ज ओझ्याखाली


दुष्काळाचा कितीक सोसावा मारा

कुठे दिसेना खळाळतांना झरा


ग्रीष्म ऋतु एकच हालहवाल

पाणी मिळे तोच दिसे लालेलाल


चला जलसंधारणा देऊ गती

करु पाणीटंचाई हद्दपार ती


पड पावसा होऊ दे पाणी पाणी

प्यासी धरा कर तिची आबादाणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy