बळीराजा
बळीराजा
1 min
1K
बळी राजा म्हणविता
सारे जग मी पोशितो
परि उपाशी राहूनी
उभं आयुष्य कष्टीतो
पैसा टाकूनी मातीत
वाटे पिकेल अमाप
पाठ दिली पावसाने
हाती रब्बी ना खरीप
कर्ज वाढे चक्रगती
भाव कवडीमोल ते
नाही चीज कष्टाला या
मज मरण आठवते
काय केलं पाप देवा
बरसत का रे नाही
शेतकरी सुखी कधी
तुला पाहवत नाही
शेती धंदा जूगारीच
अदमास नसे कोणा
शेतीमाल पिकवूनी
राजा मी केविलवाणा
