STORYMIRROR

Rohini Gaikwad

Others

3  

Rohini Gaikwad

Others

ती

ती

1 min
366

तिचे आकाश मोकळे

भास होतो पुन्हांदा

कधी सरणार भोग

मज आभास सर्वदा|१|


रोज बलात्कार वाढे

छेड पुजलेली सदा

दारु पिऊन नवरा

आणी जीवावर गदा|२|


विधवेचं जीणं काढी

शुभकार्य तिला टाळी

त्याच्या दुष्कृत्याचं ओझं

नित्य तिच्याच का भाळी|३|


अंधारल्या आभाळात

कशी घेईल ती उडी

जागोजागी टिपले

डाव खेळायला रडी


फक्त माणूसपण द्या

नका ठेवू देव्हाऱ्यात

सृजनाची आहे खाण

भर घाली वैभवात


Rate this content
Log in