STORYMIRROR

Nandini Menjoge

Romance Others

4  

Nandini Menjoge

Romance Others

ओली माती..!!

ओली माती..!!

1 min
90

उष्णतेस तप्त होती धरणी 

तीस स्पर्श शीतल थेंबाचा, 

आसुसलेल्या त्या दिवसांत 

धीर ओल्या मातीचा!!


पोळला होता कोरडा वारा 

त्यास भास शांत लहरींचा, 

कळवळलेल्या निसर्गास 

धीर ओल्या मातीचा!!


हिरवळीस शोधत होती पानं 

तेव्हा नजरेला जमाव ढगांचा, 

कोमेजलेल्या चातकास 

धीर ओल्या मातीचा!!


डोळ्यांत तिच्या प्राण जणू 

सुन्न वाट आर्त पहिली, 

निश्चिंततेचा धीर देत माती 

ओल्या सुगंधात नाहली!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance