ओढ पावसाची
ओढ पावसाची


रिमझिम येता पाऊस
हवेत भरतो गारवा,
मन होते व्याकुळ
सख्या तू भेटावा !
घेऊन हातात हात
चल फिराया जावू,
निसर्गाचा आनंद
पुन्हा नव्याने घेवू !
मनासारखे जगू चल
स्वच्छंदी आयुष्य,
भरू रंग प्रीतीचे
छान घडवू भविष्य!
ओढ पावसाची लागे
होवू चिंब चिंब,
तुझ्या डोळ्यांत साजणा
दिसे माझे प्रतिबिंब
आज पावसाने येते
मातीलाही अशी ओल,
तुझ्या रंगात रंगते
चिरंतन आणि खोल!