STORYMIRROR

Maleka Shaikh

Inspirational

4  

Maleka Shaikh

Inspirational

अजून थोडे सोस मना

अजून थोडे सोस मना

1 min
270

खूप काही सोसलंस तू

अजून थोडं सोस मना,

येतीलच दिवस सुखाचे 

थोडं तरी समजना!


असा चालू आयुष्यात 

ऊन सावलीचा खेळ,

आशा उद्याची धरून 

तूच घाल यात मेळ!


नवरा बायको रथाची चाकं

नको कधीच तू विसरू, 

देईन तुला नित्य साथ

नको अविचाराने घसरू!


आत्महत्या मार्ग नाही 

कर संकटावर मात, 

बघ चिल्यापिल्यांकडे 

नको करु जीवाचा घात!


दिवस दोन दु:खाचे

जातील असे निघून,

पुन्हा नव्या उमेदीने 

जीवन बघ ना जगून!


सर्व होईल मनासारखे 

बस्स, थोडा धर धीर, 

आनंदाने नांदेल घर

तू ठरशील खरा वीर!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational