धडपड
धडपड


धडपड रोजच चाले
बापाची माती संग,
राब-राब राबतो तरी
बदलेना जी़वन रंग!
धडपड रोजच चाले
आईची कन्येसाठी,
संस्कार, शिक्षण आणि
स्वसंरक्षण करण्यासाठी!
धडपड रोजच चाले
कामगार, मजुरांची,
निराधार, बेकारांची
पोट नित्य भरण्याची!
धडपड रोजच चाले
जीवन जगण्यासाठी,
आपलेच ओढती पाय
मागे राहण्यासाठी!
धडपड रोजच चाले
माणसाची माणसासाठी,
माणुसकीचे जपू या नाते
विश्वबंधुत्व जपण्यासाठी!